" यावल महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा "

"यावल महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा"
यावल (वार्ताहर) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग व विद्यार्थी विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न पुरस्कार प्राप्त माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे होत्या.
प्रथम डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर झुम अॅप वर एस. एम. महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. वंदना लव्हाळे यांनी "वाचनाचे महत्त्व या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन केले. त्यांनी विचार व्यक्त केले की वाचनातून प्राप्त झालेला एक विचार देखील माणसाचे आयुष्य बदलून टाकतो. वाचनाने माणूस अनुभव संपन्न व ज्ञान संपन्न होतो. चरित्र, आत्मचरित्र व वैचारिक ग्रंथ वाचल्याने व्यक्तिमत्व समृद्ध होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी विचार व्यक्त केले की, पुस्तकाचे सोबती असलेले कधीच एकटे नसतात. भाषण व लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी वाचन उपयोगी पडते. वाचनाने विविध संस्कार होतात. त्यामुळे आधुनिक युगात सुखाची गुरुकिल्ली वाचन आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. सुधा खराटे यांनी केले तर आभार प्रा. व्ही. बी. पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार, प्रा. ए. पी. पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व अनेक विद्यार्थी उपस्थित होते.