" यावल महाविद्यालयात वेडिंग आणि डिस्पोजल मशीनचे उद्घाटन "

"यावल महाविद्यालयात वेडिंग आणि डिस्पोजल मशीनचे उद्घाटन"
यावल (वार्ताहर) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या आरोग्य सुविधेसाठी यावल शहरातील प्रसुतीतज्ञ व नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी वेडिंग आणि डिस्पोसल मशीन भेट दिले.
तसेच यावल नगर परिषदेने ही वेडिंग आणि डिस्पोजल मशीन भेट दिले. या मशीनचे उद्घाटन डॉ. कुंदन फेगडे आणि यावल शहराच्या नगर अध्यक्ष नौशाद तडवी यांनी फ़ित कापून केले. याप्रसंगी डॉ. फेगडे यांनी विद्यार्थिनींना आरोग्याच्या विषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास नगरसेवक अतुल पाटील, मुबारक तडवी, ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य परिचारिका निलीमा पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी केले. तर आभार उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. संजय कदम, डॉ. सुधा खराटे, प्रा. एस.आर.गायकवाड, यांनी सहकार्य केले. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थिनी व इतर कर्मचारी उपस्थित होते.